यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: तुला मुलगी झाली आता माझ्या मुलीचा लाड कोण करेल? या भावनेतून नणंदने भावजयला यवतमाळ येथे जाळून मारले. यवतमाळ येथील पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत दातपाडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मोनिका गणेश पवार (वय २६) असे मृत भावजयचे नाव आहे. तर कांता संजय राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या नणंदचे नाव आहे.
अधिक वाचा
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत भांडण झाल्याने कांता माहेरीच राहत होती. दरम्यान, मोनिकाने ४ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला. आता माझ्या मुलीचा लाड कोण करेल? अशी भावना निर्माण झाल्याने कांता ही मोनिकाशी भांडण करीत होती.
८ जुलैला कांता हिने मोनिकासोबत कडाक्याचा भांडण केले. याकडे मोनिकाने दुर्लक्ष केले. दुपारी २ वाजम्याच्या सुमारास कांताने मोनिकाला पेटवून दिले. त्यात मोनिका ८० टक्के भाजली.
अधिक वाचा
दरम्यान जखमी मोनिकाला उपचारसाठी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, १७ राेजी रात्री तिचा मृत्यू झाला. तिला एक पाच वर्षाचा मुलगा असून १४ दिवसांची मुलगी आहे.
अधिक वाचा
मोनिकाची मावशी आशा सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसानी नणंद कांता संजय राठोड हिच्याविराेधात तक्रार दिली. त्यानुसार तिच्याविराेधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चापाईतकर व सहकारी करीत आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…