Latest

नांदेड गँगवारनं हादरलं; विक्की ठाकूरची गोळ्या घालून हत्या

दीपक दि. भांदिगरे

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरात गँगवारचा भडका उडाला आहे. नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून नांदत असलेल्या शांततेला टोळी युद्धामूळे पुन्हा एकदा दहशतीचा सामना करावा लागला. कुख्यात गुंड विक्की ठाकूर याचा तीन गावठी पिस्टलमधून गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. गँगवारची ही घटना मंगळवारी रात्री गाडीपूरा येथे घडली.

अधिक वाचा :

पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कैलास बिघानिया आणि विक्की चव्हाण या दोन टोळ्यांमध्ये मागील काही वर्षापासून वर्चस्वावरुन टोळीयुद्ध सुरु आहे. मागील वर्षी विक्की चव्हाण याचा बिघानिया टोळीने खून केला होता.

या प्रकरणी कैलास बिघानिया तुरुंगात आहे. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा विश्‍वासू मोहरा होता.

अधिक वाचा :

मंगळवारी रात्री विक्की ठाकूर हा गाडीपूरा भागात असताना तीन जण दुचाकीवर आले. त्यांनी त्याच्यावर पिस्टलमधून गोळीबार केला. या गोळीबारात विक्की जागीच ठार झाला; परंतु त्यानंतरही त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.

अधिक वाचा :

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. परिसरात असलेल्या एका सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली असून एकूण आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी काही टीम रवाना झाल्या आहेत.

विक्की ठाकूरवर पाच गंभीर गुन्हे

कुख्यात गुंड विक्की ठाकूर याच्यावर नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे नोंद आहेत. गुंड विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आला होता. पण आता तीन गावठी पिस्टलमधून गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT