राजस्थान : बिकानेरमध्ये भूकंपाचा धक्का, तीव्रता ५.३ रिश्टर स्केल | पुढारी

राजस्थान : बिकानेरमध्ये भूकंपाचा धक्का, तीव्रता ५.३ रिश्टर स्केल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: राजस्थान येथील बिकानेर शहराला आज पहाटेच्या सुमारास भूकंपनाच्या तीव्र धक्का बसला. राजस्थान येथील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ नोंदविली गेली आहे.

बिकानेर शहराला आज बुधवारी (दि.२१) रोजी पहाटे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ नोंदविली गेली.

अधिक वाचा 

संबंधित बातम्या

नॅशनल तेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, आज पहाटे ५. २४ वाजता बीकानेरमध्ये भूकंप झाला. यामुळे कोणतीही वित्त किंवा जीवित्त हानी झालेली नाही.

मेघालय-लडाखमध्येही भूकंप

राजस्थानच्या आधी मेघालयमध्ये रात्री २.१० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली. अहवालानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम गॅरो हिल्स येथे होते. परंतु, अद्यापपर्यंत मेघालयात कोणातीही वित्त किंवा जीवित्त हानी झालेली नाही.

अधिक वाचा 

त्याशिवाय लेह-लडाख भागातही आज पहाटे ४.५७ वाजता भूकंपाचे धक्का जाणवला, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ होती.

अधिक वाचा 

यापूर्वी गुजरातमधील कच्छ भागात १८ जुलै २०२१ रोजी भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ नोंदविण्यात आली होती.

या महिन्याच्या सुरूवातीला हिमाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि दिल्लीमध्येही भूकंपाचा धक्का जाणवला होता.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

Back to top button