तिरुपती ला अर्पण केली पाच किलो सोन्याची तलवार | पुढारी

तिरुपती ला अर्पण केली पाच किलो सोन्याची तलवार

हैदराबाद : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिरात अनेक भाविक सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू भगवान व्यंकटेश्वर बालाजीला अर्पण करीत असतात. आता एका भक्ताने तब्बल पाच किलो वजनाची सोन्याची तलवार भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केली आहे. या तलवारीची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

हैदराबादच्या एका दाम्पत्याने ही सोन्याची तलवार अर्पण केली आहे.

गेल्या वर्षभरापासून त्यांना ही तलवार व्यंकटेश्वरास अर्पण करण्याची इच्छा होती.

मात्र, कोरोना महामारीमुळे यामध्ये विलंब होत गेला.

काल सकाळी त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकार्‍यांकडे ही सोन्याची तलवार सुपूर्द केली.

या तलवारीचे नाव ‘सूर्य कटारी’ असे आहे. ही तलवार त्यांनी तामिळनाडूच्या कोयंबतूरमधील ज्वेलरकडून बनवून घेतली आहे.

पाच किलो वजनाच्या या तलवारीमध्ये दोन किलो सोने आणि तीन किलो चांदी आहे.

यापूर्वी तामिळनाडूच्या तेनी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी थांगा दोराई यांनी 2018 मध्ये भगवान व्यंकटेश्वराला 1.75 कोटींची व सहा किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण केली होती.

Back to top button