Latest

केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन

backup backup

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन: कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (ता. ९ ) निधन झाले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८२ वर्षांचे होते. ते उत्तम क्रिकेटपटू आणि बॅडमिंटन खेळाडू होते.
अंत्ययात्रा दुपारी दोन वाजता निघणार आहे.

मोमीन यांनी केएसएच्या विविध पदांवर काम केले. त्यांनी दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडली.

महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविला.

ते गोलंदाज होते. उत्कृष्ट क्रीडा संघटक असलेले मोमीन यांनी केएसएमध्ये दीर्घकाळ काम केले.

महाराष्ट्र राज्य लॉंग टेनिस असोसिएशनवर ते ४० वर्षे कार्यरत होते.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या विविध पदांवर त्यांनी काम केले.

वय झाले असले तरीही त्यांनी क्रीडा क्षेत्रातील नवोदितांना नेहमी मार्गनर्शन केले.

केएसए म्हणजे फुटबॉल असे समीकरण असताा त्यांनी लॉन टेनिससाठी केलेले काम उल्लेखनीय आहे.

त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनमध्ये तब्बल ४० वर्षे काम केले.

मोमीन हे केएसए लॉन टेनिसचे सचिव आणि ऑल इंडिया टेनिस संघटनेचे ते आजीव सदस्य होते.

सध्या ते कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

मोमीन हे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव आणि उपाध्यक्षही होते. मोमीन आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांचा स्नेह होता.

सरदार मोमीन यांचे निधन झाल्याची बातमी समजताच क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त हाोत आहे.  त्यांच्या पश्चात पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT