

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांनी नऊ महिन्यांनंतरही १२ आमदारांच्या नियुक्तीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील नैसर्गिक संकटे सुरुच आहेत. त्याचबरोबर कोरोना आणि ईडीची सुरु असलेली कारवाई आदी मुद्यांनी ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सेना आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अनुषंगाने काही चर्चा होते का? हे औत्सुक्याचे असेल.
हे ही वाचलं का?