बडतर्फ सचिन वाझे याने ‘एनआयए’कडे केली ‘ही’ मागणी

बडतर्फ सचिन वाझे याने ‘एनआयए’कडे केली ‘ही’ मागणी

मुंबई, पुढारी ऑनलाईन: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने ह्रदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईत हलवावे अशी विनंती एनआयए न्यायालयात केली आहे. गुरुवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. वाझे मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलिसांतून बडतर्फ आहे. सध्या तो भिवंडी येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी उभी करण्यात वाझे याचा हात असल्याचा आरोप आहे.

तसेच जिलेटिन भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या बडतर्फ सचिन वाझे यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एनआयएने त्याला अटक केली.

त्यानंतर मुंबई पोलिसांतून त्याला बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

त्यावेळी डॉक्टरांनी हृदयविकाराविषयी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, होता.

याचा संदर्भ देत त्याने पूर्वी खासगी रुग्णालयात उपचार घेऊ देण्याची विनंती न्यायालयाला अर्जाद्वारे केली होती.

तुरुंगात प्रकृती खालावल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होतो.

प्रकृतीच्या कारणाखाली केलेला जामीन अर्ज प्रलंबित असतानाच उपचारादरम्यान दगावलेले स्टॅन स्वामी यांच्यासारखे आपले होऊ नये,

असे म्हणणेही वाझेने त्याविषयीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात मांडले होते.

न्यायालयाने ३० ऑगस्ट रोजी वाझेचा अर्ज मान्य करून त्याला त्याच्या निवडीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा दिली.

त्याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

आता पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची विनंती त्याने अर्जाद्वारे केली आहे.

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news