Latest

ॲमेझॉन सोबत व्यवसाय करून गल्ला जमवा! काय आहे आयडिया?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲमेझॉन सोबत व्यवसाय करणार असाल तर आपल्याला चांगली संधी आहे.  दोन वर्षापासून कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. याकाळात ई-कॉमर्स चांगले दिवस आले आहेत.

ई-कॉमर्स कंपन्या विस्तारही मोठ्या प्रमाणत करत आहेत. जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर तुम्ही फ्रेंचाइजी बिझनेसच्या मदतीने आपण दरमहा मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. यात आपण ॲमेझॉन डिलीव्हरी फ्रेंचाइजी कशी घ्यायची आणि यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे ते पाहू.

अधिक वाचा 

तसे ॲमेझॉन फ्रेंचाइजी घेण्यासाठी आपल्याला मोठ्या गुंतवणूकीची आणि मोठ्या जागेची आवश्यकता आहे, पण Amazon I have Space program यासाठी एक रुपया खर्च करण्याची गरज नाही. तसे, या प्रोजेक्टशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याकडे जागा असणे आवश्यक आहे जिथे स्टोरेज केले जाऊ शकते. जर आपण दुकानदार असाल आणि दुकानात मोकळी जागा असेल तर आपण सहजपणे या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेऊ शकता. आणि दरमहा हजारो रुपये मिळवू शकता.

लवकरात लवकर डिलिव्हरीसाठी सुरु केला प्रोजेक्ट

ॲमेझॉनने आय स्पेस प्रोग्राम सुरू केला आहे. जेणेकरून डिलिव्हरी लवकरात लवकर होईल. याअंतर्गत, आपल्याकडे जागा आणि वेळ असल्यास आपण आपल्या क्षेत्रात ॲमेझॉनसाठी स्थानिक डिलीव्हरीचे काम करू शकता. तुम्हाला प्रत्येक डिलिव्हरीसाठी कमिशन मिळेल. यामुळे कंपनीचे काम सोपे होणार आहे. तसेच आपली चांगली कमाई देखील होणार आहे.

2 ते 3 किलोमीटरच्या परिघात फिरावं लागणार

एखादा दुकानदार असेल तर तो या प्रोजेक्टमध्ये काम करु शकतो. यामध्ये, डिलिव्हरी सामान आपल्या दुकानात ठेवले जोते. नंतर तेच डिलीव्हरी करावी लागणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्र 2-3 कि.मी. मिळेल. डिलिव्हरीसाठी सामान तेवढेच मिळते जे 2-3 तासात पूर्ण होईल. जर एखाद्या ग्राहकाने तुमच्या दुकानात येऊन डिलिव्हरी घेतली तर तुम्हाला नवीन ग्राहक देखील मिळतील.

एक बाईक आणि स्मार्टफोन पाहिजे

या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी एका बाईकची आवश्यकता आहे. आणि स्मार्टफोन देखील आवश्यक आहे. तसेच तुमच्या दुकानात सामान ठेवण्यासाठी जाग्याची आवश्यक्ता आहे. प्रति डिलिव्हरी तुम्हाला 15 ते 20 रुपये मिळतील. जय तुम्ही या प्रोजेक्टमध्ये काम करणार असाल तर Google वरती जावून Amazon I have space हे टाईप करा तुम्हाला यात सगळी माहिती मिळेल.

हे ही वाचल का :

हे पाहा : 200 वर्षे जुने बंगले असणारं मुंबईतलं म्हातारपाखाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT