

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : राहुल रेखावार कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी झाले आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात बदली झाली आहे. राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
अधिक वाचा
विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात संयुक्त सचिवपदावर बढती मिळाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी येत असलेल्या राहुल रेखावार २०११ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. ते अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.
अधिक वाचा