Latest

अनंत चतुर्दशीला साजरा होणार नव्या नात्यांचा श्रीगणेशा

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गणेशाच्या आगमनाने वातावरणात एक अनोखं चैतन्य पसरतं. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना मात्र डोळे भरून येतात. सध्या प्रत्येक जण विघ्नहर्त्या गणरायाकडे एकच मागणं मागतोय सर्व दुःखांचा नाश होऊ दे. कोरोना रुपी संकटातून बाहेर पडून सर्वाचं जीवन सुरळीत सुरु होऊ दे. अनंत चतुर्दशीला आता दुःखांचं विसर्जन आणि सुखाचं आगमन होणार आहे कारण, या अनंत चतुर्दशीला झी मराठीवर नव्या नात्यांचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या नात्यांचा श्रीगणेशा हा विशेष कार्यक्रम झी मराठी रविवारी पाहता येणार आहे.

झी मराठी वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल ५ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली.

हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी हा कार्यक्रम हातभार लावणार आहे.

या कार्यक्रमातून प्रहसन, गाणी आणि डान्स हे सगळंच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. चला हवा येऊ द्या फेम निर्मितीसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.

अंकिता लोखंडे, सोनाली कुलकर्णी, अक्षया देवधर, नेहा खान, अस्मिता देशमुख यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस आहेत. त्याचसोबत सलील कुलकर्णी, नंदेश उमप, अभिजीत सावंत यांचे सुमधुर परफॉर्मन्सेस सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील.

मराठी मनातला, आपल्या घरातला गणपती आहे. नक्की यायचं! १९ सप्टेंबर, संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

SCROLL FOR NEXT