

बहुमजली पीक पद्धतीमध्ये पिकांच्या उंचीनुसार क्रमाने पिकांची लागवड केली जाते. प्रथम जास्त उंची असलेली झाडे, नंतर मध्यम उंची असलेली झाडे आणि त्याखालोखाल कमी कमी उंची असलेली झाडे अशा क्रमाने पिकांची लागवड केली जाते. बहुमजली पीक पद्धत एकाच जमिनीवर घेतली जाते. काही पिकांवर प्रखर उष्णता मानवत नाही. त्यांच्या योग्य वाढीकरिता आणि अधिक उत्पादनासाठी सावली मिळणे आवश्यक असते. अशावेळी वेगवेगळ्या उंचीची झाडे लावल्यानंतर एका पिकाला दुसर्या पिकामुळे सावली मिळते. या पद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जास्त उंची असलेल्या नारळाच्या बागेत कोकोसारख्या मध्यम उंचीची झाडे लावणे आणि त्याखाली कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिके लावणे हे होय.