Latest

स्पा ची चौकशी, कॉलगर्ल्सची माहिती; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले ट्विट

backup backup

सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पुराव्यांसहीत सादर केले आहे. त्यांनी स्पाची चौकशी करण्यासाठी जस्ट डायल Justdial वर चौकशी केली तर त्यांना ५० मेसेज आले. त्यात जवळपास १५० कॉलगर्ल्सची माहिती दिली आहे. या धक्कादायक माहितीचे स्क्रीन शॉट त्यांनी ट्विटरवर टाकले असून त्यांनी Justdial ला जाब विचारला आहे.

स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी फेक नावाने Justdial वर स्पाची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ५० मेसेज आले. त्यात १५० कॉल गर्ल्सची माहिती आणि रेट सांगण्यात आले. (स्पा – कॉलगर्ल्सची माहिती)

या घटनेची माहिती स्वाती मालीवाल यांनी ट्विटवरून दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, 'आम्ही Justdialवर कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे. या धंद्याला चालना देण्यासाठी Justdial ची भूमिका काय आहे?"

स्पा- कॉलगर्ल्सची माहिती : समन्स बजावले

या प्रकरणानंतर मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना समन्स बजावले आहे. त्या म्हणाल्या, Justdial या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असे मालीवाल म्हणाल्या. दिल्लीत अनेक ठिकाणी स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असतात. पोलिस वारंवार त्यांच्यावर कारवाई करत असूनही छुप्या पद्धतीने हे व्यवसाय सुरू असतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT