Latest

काय थापा मारतो तुझ्या फाईलवर सही झाली : अजित पवार

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनावर किती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारीक नजर असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खाजगी कामानिमित्त अनेक मंडळी अजित पवारांना भेटत असतात. तशाच प्रकारे आजही काही कामानिमित्त नागरिक अजित पवारांना भेटत होते.

यामध्ये एका क्लबच्या कामासाठी एक व्यक्ती अजित पवारांना भेटली. यावेळी त्या व्यक्तीने अजित पवार यांना आपले काम करण्याची विनंती केली. त्यावेळी अजित पवार मोठ्या आवाजामध्ये त्यांना ओरडले. अरे तुझ्या फाईलवरती सही झाली आहे. जरा तू माहिती घे असा सल्ला त्यांनी दिला.

मात्र त्या व्यक्तीने अजित पवारांना वारंवार विनंती करत दादा माझे काम करायला सांगा अशी विनंती चालू ठेवली. यावर अजित पवार चिडून म्हणाले लाव रे सचिवांना फोन.. विचारा यांच्या कामाचं काय झालं. अजित पवारांनी फोन लावला असता त्या फाईलवर सही कालच झाली असल्याचे उत्तर संबंधित सचिवांनी दिले.

यावर अजित पवार म्हणाले अरे जरा माहिती घेऊन माझ्याकडे येत जा मी सांगतोय तुझ्या फाईलवर सही झाली आहे. यावेळी जवळ असलेले नागरिक काही काळासाठी स्तब्ध झाले. पुन्हा एकदा अजित पवारांचा प्रशासनावर वचक समोर आला.

हेही वाचलत का :

'बेगम' अनुजाला सासर आवडतं की माहेर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT