Jr NTR च्या ३.१६ कोटींच्या गाडीची नंबरप्लेट १७ लाखांची !!! | पुढारी

Jr NTR च्या ३.१६ कोटींच्या गाडीची नंबरप्लेट १७ लाखांची !!!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ‘लम्बोर्गिनी उरूस ग्रेफाइट कॅप्सुल’ ही महागडी आणि आलिशान कार खरेदी केली. आता या कारची किंमत ३. १६ कोटी इतकी आहे.

ज्युनिअर एनटीआरची (Jr NTR) ही महागडी विशेष आहेच, पण बातमीचा विषय हा आहे की, त्याने या कारच्या नंबरप्लेटसाठी एक नाही, दोन नाही, तर तब्बल १७ लाख रुपये मोजले आहेत.

Jr NTR

आता ज्या नंबरसाठी ज्युनिअर एनटीआरनं १७ लाख मोजलेत, तो नंबर कोणता बरं असेल? हा नंबर आहे ९९९९ आहे. हो. याच नंबरसाठी त्याने १७ लाख मोजले आहेत.

तर त्याच्या या लक्झरी कारचा संपूर्ण नंबर आहे TS 09 FS 9999 असा आहे. कारचं वैशिष्ट्य पाहिलं तर, हा कार ३.६ सेकंदात ताशी १०० वेगाने धावू शकते. गाडीचं टाॅप स्पीड हे ३०५ इतकं आहे.

Jr NTR

ज्युनिअर एनटीआरकडे अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. त्याच्या बीएमडब्ल्यु ७२० एलडीचा नंबरदेखील ९९९९ असाच आहे. ज्युनिअर एनटीआरचं असं म्हणणं आहे की, हा नंबर त्याच्यासाठी लकी आहे.

ज्युनिअर एनटीआर महागड्या कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीड-बेंझ जीएलएस ३५० आणि बीएमडब्ल्यु ७२० अशा महागड्या कार आहेत. त्याच्याकडे पोर्श ७१८ नावाची जी कार आहे, त्याची किंमत १.५ कोटी इतकी आहे.

पहा व्हिडीओ : व्हायरल Manike ला मराठी तडका – apurva naniwadekar

Back to top button