Recipe of Dudhachi Aamti : राधानगरीची दुधाची आमटी कशी कराल?

Recipe of Dudhachi Aamti : राधानगरीची प्रसिद्ध दुधाची आमटी कशी कराल?
Recipe of Dudhachi Aamti : राधानगरीची प्रसिद्ध दुधाची आमटी कशी कराल?
Published on
Updated on

खवय्यांना नवीन पदार्थ म्हटला की त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय रहावत नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी खाद्यसंस्कृती आपल्याला दिसून येते. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा देशभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक अनोखा पदार्थ प्रसिद्ध आहे तो म्हणजे दुधाची आमटी. मुख्यतः राधानगरी तालुक्यात बनविली जाणारी दुधाची आमटी खूप चविष्ट असते. तुम्हीही घरी दुधाची आमटी बनवू शकता. (Recipe of Dudhachi Aamti)

साहित्य

१. दूध १ लिटर
२. तीळ ३० ग्रॅम
३. जिरे १० ग्रॅम
४. खोबरे एक वाटी
४. गरम मसाला १० ग्रॅम
५. मिरची पावडर ४ ते ५ चमचे
६. हळद १ चमचा
७. आले दीड इंच
८. लसूण १० ते १५ पाकळ्या
९. कोथिंबीर- गरजेनुसार
१०. कांदा २ मोठे
११. कसुरी मेथी एक छोटा चमचा
१२. टोमॅटो १

कृती (Recipe of Dudhachi Aamti)

१. कसुरी मेथी सोडून वरील सर्व एकत्र वाटण करणे.
२. कांदा तेलात परतून घेऊन त्यात वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
३. अगोदर गरम केलेल दूध त्यात मिसळा आणि १० मिनिटे शिजवत ठेवा. सतत ढवळत रहावे.
४. सर्व्ह करतानाच दुधाच्या आमटीत मिठाचा वापर करावा.

टिप..

दुधाची आमटी करण्यासाठी चांगलं घट्ट असं दूध हवे. दूध चांगलं तापवून घेतलेलं हवं. एक लीटर आमटी करण्यासाठी कोल्हापुरी मटण रस्स्यासाठी जो मसाला आपण वापरतो तोच वापरावा. त्यात फक्त कोल्हापुरी मिरची मसाल्याचा (चटणी) वापर करु नये. कारण त्यात मिठाचा वापर केलेला असतो. त्यामुळे आमटी शिजत असताना त्याचा वापर केला तर दूध फाटण्याची शक्यता असते. तसेच दूध आमटी शिजत असताना त्यात थेट मीठ घालू नका.

तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर काळ्या मिरीचे चार दाणे वाटणामध्ये टाकावेत. दुधाला चांगली उकळी आली की त्यात वाटलेला मसाला घालावा. त्यात तुम्हाला वेगळा फ्लेवर द्यायचा असेल तर कसुरी मेथीचा वापर करा.

आमटी सर्व्ह करत असताना त्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालावे. मीठ थेट दूध आमटी शिजत असताना टाकलं तर दूध फाटू शकते.

दुधाची आमटी बनवत असताना काश्मिरी मिरची पावडरचादेखील वापर केला तरी चालेल.

पहा व्हिडिओ : वांग्याचं हे भरीत बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल | spicy recipe of brinjal

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news