उस्मान ख्वाजा म्हणतो; पैसा बोलतो, पाकिस्तानला दिलात, भारताला नकार देणार नाही! | पुढारी

उस्मान ख्वाजा म्हणतो; पैसा बोलतो, पाकिस्तानला दिलात, भारताला नकार देणार नाही!

पुढारी ऑनलाई डेस्क

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या निर्णयामागे काही आर्थिक कारणेही असतात असे सांगितले. उस्मान ख्वाजा म्हाणाला की पाकिस्तानात दौरा करण्यासाठी त्याला कोणतीही अडचण वाटत नाही.

उस्मान ख्वाजाचा जन्म हा पाकिस्तानात झाला आहे. मात्र त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. तो सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा एक भाग आहे. ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

उस्मान ख्वाजा म्हणाला, ‘मला असे वाटते की खेळाडू आणि संघटनांना पाकिस्तानात खेळण्यास नकार देणे सोपे आहे. कारण तो पाकिस्तान आहे.’ तो पुढे म्हणाला की, ‘माझ्या मते हीच गोष्ट बांगलादेशलाही लागू होते. पण, जर भारतावरही अशी परिस्थीती ओढवली तर मात्र कोणीही भारताला नकार देऊ शकत नाही.’

ख्वाजाने ‘पैसा बोलतो, आपल्याला सर्वांना हे माहीत आहे. पाकिस्तान वेळोवेळी आपल्या मालिकांमधून क्रिकेट खेळण्यासाठी ते ठिकाण सेफ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असे वाटते की पुन्हा तेथे क्रिकेट खेळण्यासाठी न जाण्याचे काही कारणच नाही.’ असे म्हणत पाकिस्तानला आपले समर्थन दिले. तो पुढे म्हणाला की, तेथे खूप कडक सुरक्षा आहे. मोठ्या प्रमणावर सुरक्षा देण्यात आली आहे.

‘मी ऐकल्याप्रमाणे तेथील अधिक लोकांना सुरक्षित वाटते. पाकिस्तान सुपर लिगवेळी मी लोकांशी बोलला त्यावेळी त्यांनीही मला हीच गोष्ट सांगितली. १० वर्षापूर्वी पाकिस्तान सुरक्षित नसेलही मात्र आता शंभर टक्के आहे.’

न्यूझीलंडने रावळपिंडीमधील एकदिवसीय सामना सुरु होण्याच्या काही मिनिटे आधीच मालिकेतून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांनी सुरक्षेचे कारण दिले होते. हा या मालिकेतील पहिलाच सामना होता. त्यानंतर इंग्लंडनेही मालिकेतून माघात घेत त्यांचा पुरुष आणि महिलांचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानच्या एका मंत्र्याने न्यूझीलंडला मिळालाला सिक्युरिटी थ्रेट हा भारतातून जनरेट झाला होता असा जावई शोध लावला आहे. त्याने न्यूझीलंडला फेक अलर्ट पाठवण्याचे षडयंत्र भारताचे आहे असा बिनबुडाचा आरोप केला आहे.

Back to top button