Latest

GandhiJayanti : महात्मा गांधी यांच्‍या विषयी हे ८ चित्रपट तुम्ही पाहिले का? 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : GandhiJayanti – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज २ ऑक्‍टोबरला जयंती. महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना गांधी यांच्‍याविषयी जाणून घेता आले. त्‍यांच्‍या जीवनावरील या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांविषयी जाणून घेऊया. (GandhiJayanti)

गांधी यांच्‍या आयुष्‍यावर सर्वात महत्त्‍वाच्‍या चित्रपटाची निर्मिती रिचर्ड एटनबरो यांनी केली. १९८२ मध्‍ये 'गांधी' हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात हॉलिवूड कलाकार बेन किंस्ले यांनी गांधीजी यांची व्‍यक्‍तीरेखा साकारली होती. 'गांधी' चित्रपटाला ऑस्कर ॲवॉर्ड देखील मिळाला होता.

श्याम बेनेगल यांनी महात्‍मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर 'द मेकिंग ऑफ गांधी' चित्रपट साकारला. चित्रपटात गांधीजींची व्‍यक्‍तीरेखा रजित कपूर यांनी केली होती. चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी ते महात्‍मा बनण्‍यापर्यंतचा प्रवास दाखवण्‍यात आला. १९९६ मध्‍ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

२००७ मध्‍ये फिरोज अब्बास मस्तान यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली 'गांधी माय फादर' रिलीज झाला. या चित्रपटात दर्शन जरीवाला महात्‍मा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधी आणि त्‍यांचा मुलगा हरीलाल यांच्‍या नात्‍यांवर आधारित होता.

गांधी यांच्‍या हत्येच्‍या प्रसंगावर कमल हासन यांनी 'हे राम' चित्रपट बनवला.

चित्रपट २००० मध्‍ये रिलीज झाला होता. चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती.

जब्बार पटेल यांनी २००० मध्‍ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपट आणला. चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि गांधी यांच्‍यासोबत असलेलं त्‍यांचं नातं दर्शवण्‍यात आलं होतं. मोहन गोखले यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा साकारली होती.

राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या आयुष्‍यावर आधारित 'सरदार' चित्रपटाची निर्मिती १९९३ मध्‍ये केतन मेहता यांनी केली होती.

चित्रपटात गांधी आणि सरदार पटेल यांचं नातं कसं होतं, हे दर्शवण्‍यात आलं.

गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा अन्नू कपूर यांनी साकारली होती. तर सरदार पटेल यांची व्‍यक्‍तिरेखा परेश रावल यांनी साकारली होती.

'मैंने गांधी को नहीं मारा'

'मैंने गांधी को नहीं मारा' या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती.

आपणच गांधीजींची हत्‍या केली आहे, असे त्‍या व्‍यक्‍तीला (अनुपम) वाटत असते, अशी कथा चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. २००५ मध्‍ये जहनु बरुआने हा चित्रपट आणला होता.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT