पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पुणे विमानतळावर भेट घेणार आहेत. आज शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पुणे विमानतळावर केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन होत आहे.
या दरम्यान शरद पवार आणि गडकरी यांची भेट ठरली असल्याचे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गडकरी यांनी मोठ्या प्रकल्पांचा धडाका लावला आहे. बारामती मतदारसंघातील अनेक प्रकल्प जोरदारपणे सुरू आहेत. पालखी मार्ग, पुरंदर विमानतळ, पुण्याचा रिंग रोड या प्रकल्पांनी गती घेतली आहे.
त्या संदर्भात शरद पवार आणि गडकरी यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.