Latest

Raosaheb Danve : इंधनाचे दर अमेरिका ठरवते; केंद्राला दोष देणे चुकीचे

नंदू लटके

इंधनाचे दर अमेरिका ठरवते त्‍यामुळे याबाबत केंद्र सरकारला दोष देणे चुकीचे आहे, असा युक्‍तीवाद केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांनी केला. औरंगाबाद येथे भाजप कार्यालयाच्‍या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) म्‍हणाले. केंद्र सरकारने नुकताच इंधनावरील अबकारी कर कमी केला आहे. मात्र महाराष्‍ट्रासह अनेक राज्‍यांनी व्‍हॅट कमी केलेला नाही. त्‍यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. राज्‍यांनी व्‍हॅट दर कमी करावेत, असे आवाहनही त्‍यांनी केले.

Raosaheb Danve : इंधन दरात चढ-उतार सुरुच असतात

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीनुसार इंधन दर निश्‍चित होता. एखाद्‍या दिवशी हे दर ३५ पैशांनी वाढतात तर दुसर्‍या दिवशी एक रुपयांनी कमीही होतात तसेच पुन्‍हा ५० पैशांनी वाढतात. आतंतराष्‍ट्रीय बाजारातील परिस्‍थितीनुसार या दरांमध्‍ये चढ-उतार सुरुच असतात. या किंमती अमेरिकेमध्‍ये ठरवल्‍या जातात.त्‍यामुळे इंधन दरवाढीबाबात आंदोलन करणे आणि केंद्र सरकारला दोष देणेच चुकीचे आहे, असेही दानवे म्‍हणाले.

केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केला आहे. मात्र काँग्रेसशासीत राज्‍ये आणि विरोधी पक्षांची सत्ता असणार्‍या राज्‍यांनी इंधनावरील व्‍हॅट कमी केलेला नाही. यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत असल्‍याचे सांगत त्‍यांनी राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या धोरणावर टीका केली.

हेही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT