'एलजीबीटीक्‍यू' समुदायाची विराट कोहलीवर नाराजी ; काय आहे कारण? | पुढारी

'एलजीबीटीक्‍यू' समुदायाची विराट कोहलीवर नाराजी ; काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्‍या मालकीच्‍या रेस्‍टॉरंटमधील एका शाखेत ‘एलजीबीटीक्‍यू’ समुदायाला बंदी असल्‍याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील माहिती वी एक्‍झिस्‍ट या पेजवरुन शेअर करण्‍यात आली आहे. यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरुन विराट कोहलीविषयी तीव्र नाराजी व्‍यक्‍त होत आहे. ( ‘एलजीबीटीक्‍यू’ म्‍हणजे लेस्‍बियन, गे, बायसेक्‍श्‍युअल, ट्रान्‍सजेंडर आणि पारंपरिकदृष्‍ट्या सर्वसामान्‍य लैंगिक ओळख असलेल्‍यांपेक्षा वेगळी ओळख असलेला समुदाय. )

विराट कोहलीच्‍या मालकीच्‍या वन ८ कम्‍यून या रेस्‍टॉरंटची चेन आहे. दिल्‍ली, कोलकाता आणि पुणे येथे या रेस्‍टॉरंटच्‍या शाखा आहेत. या रेस्‍टॉरंटच्‍या पुणे येथील शाखेत एलजीबीटीक्‍यू समुदायाच्‍या लोकांना एंट्री नसल्‍याचा दावा करणारी पोस्‍ट सध्‍या ट्‍टविटरच्‍या माध्‍यामातून मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. या निर्णयामुळे अनेकांनी विराट कोहलीवर तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

दोन आठवड्यापूर्वी आम्‍ही यासंदर्भात विराटला मेसेज दिला होता. मात्र आम्‍हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. यानंतर रेस्‍टॉरंटच्‍या पुणे शाखेशी संपर्क केला. आम्‍हाला फोनवरुन माहिती मिळाली की, या रेस्‍टॉरंटमध्‍ये समलैंगिक जोडप्‍यांना प्रवेश नाही. यासंदर्भात रेस्‍टॉरंटच्‍या दिल्‍ली शाखेने कोणतेही उत्तर दिले नाही. तर रेस्‍टॉरंटमध्‍ये सर्वांना प्रवेश आहे, असे कोलकाता शाखेने स्‍पष्‍ट केले आहे.

भारतामध्‍ये अनेक रेस्‍टॉरंट, बार आणि क्‍लॅबमध्‍ये एलजीबीटीक्‍यू समुदायाला होत असतोच. आता विराट कोहलीच्‍या रेस्‍टॉरंटमध्‍येही अशा प्रकारचा भेदभाव होत असल्‍याचे या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे. ही पोस्‍ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे. ट्‍विटरवर विनय तिवारी याचे Vini नावाने अकाउंटआहे. त्‍याने याबाबत ट्‍विट केले आहे की, तुम्‍ही विराट कोहली यांच्‍याकडून कोणती अपेक्षा करु शकता? विरोट कोहली फक्‍त प्रगतीवर भाषण करु शकतो. रेस्‍टॉरंटमधील नो एंन्‍ट्रीबाबत विराट आणि अनुष्‍का या प्रकरणी काही बोलणार आहेत का? असा सवालही विनय तिवारी याने केला आहे.

सोशल मीडियावरील व्‍हायरल माहिती चुकीची : वन ८ कम्‍यून

विराट कोहलीच्‍या रेस्‍टॉरंटबद्‍दल सोशल मीडियावर व्‍हायरल झालेली माहिती ही अत्‍यंत चुकीची आहे, असे वन ८ कम्‍यून रेस्‍टॉरंटने प्रसिद्‍धी पत्रकात म्‍हटलं आहे. आमच्‍या रेस्‍टॉरंटमध्‍ये कोणत्‍याही समुदायाबाबत भेदभाव केला जात नाही, असे यामध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ : लेस्‍बीयन, गे म्‍हणजे नेमकं काय ?

 

Back to top button