सोलापूर : अक्‍कलकोटहून परतताना काळाचा घाला, जीपचा टायर फुटून भीषण अपघात; ४ जण ठार | पुढारी

सोलापूर : अक्‍कलकोटहून परतताना काळाचा घाला, जीपचा टायर फुटून भीषण अपघात; ४ जण ठार

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा

अक्‍कलकोटहून दर्शन करून सोलापूरकडे येत असलेल्या प्रवासी जीपचा अपघात झाला. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात चारजण ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच १३ एएक्स १२३७ या जीपचे पुढील टायर फुटल्याने सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तीन ते चार जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. एकूण आठ प्रवाशांपैकी चार जण गंभीर जखमी व चारजणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये काही मुले व महिलाचाही समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले असून, वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात एवढा भयानक होता की गाडी रस्त्याच्या कडेला जावून पडली.

Back to top button