हार्दिक पांड्या अडचणीत, कस्टम विभागाने ५ कोटींची दोन घड्याळे केली जप्त

हार्दिक पांड्या अडचणीत, कस्टम विभागाने ५ कोटींची दोन घड्याळे केली जप्त

टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याच्या अडचणीत वाढ झाली आहे. ताे मैदानावर फॉर्मसाठी झगडत आहेच. आता मैदानाच्या बाहेरही अडचणीत आला आहे. रविवारी हार्दिक संघासह युएईतून परतला आहे. यावेळी विमानतळावर कस्टम विभागाने त्याचे दोन घड्याळे जप्त केली.

टीम इंडिया रविवारी T20 वर्ल्ड कप 2021 नंतर भारतात परतली आहे. यावेळी विमानतळावर कस्टम विभागाला हार्दिक पांड्या जवळ दोन घड्याळ आहेत त्याची किंमत ५ कोटी असल्याची माहिती मिळाली.

मुंबई इंडियन्सच्या या ऑलराउंडर जवळ दोन घड्याळांचे बिल नव्हते. तसेच त्याने ही घड्याळे कस्टम वस्तू म्हणून दाखवली नाहीत. त्यामुळे कस्टम विभागाने ती घड्याळे जप्त केली. हार्दिक आपल्या किंमती घड्याळांमुळे या अगोदरही चर्चेत होता. याअगोदर हार्दिक पांड्याकडे १० कोटींचे घड्याळ होते.

मागील वर्षी हार्दिक पांड्या याचा भाऊ क्रुणाल पांड्याला मुंबई विमान तळावर दुबईतून परत येत असताना थांबवले होते. तेव्हा त्याच्याजवळ सोने व किंमती वस्तु मिळाल्या होत्या. क्रुणाल जवळ एक कोटींचं सोनं आणि कोही अन्य किंमती वस्तु सापडले होते. त्या वस्तुंचे कागदपत्रे नव्हती.

टी-२० विश्वचषकात पांड्या सपशेल अपयशी ठरला

हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग आणि बॅटींगमध्ये खराब काम केले आहे. पाच मॅचच्या तीन इनिंगमध्ये फक्त ६९ रन्स करू शकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा ऑलराउंडर खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

भाऊंमुळेच 'लालपरी' रस्त्यांवरून धावते !!!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news