sushant : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे ५ नातेवाईक अपघातात ठार | पुढारी

sushant : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे ५ नातेवाईक अपघातात ठार

लखीसराय : पुढारी ऑनलाईन

बिहारमधील लखीसराय जिल्‍ह्यात जुमई येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग  राजपूत (sushant singh rajput )याच्‍या ५ नातेवाईकांसह सहा जण ठार झाले. सर्वजण पाटणा येथील नातेवाईकाच्‍या अंत्‍यसंस्‍कारानंतर घरी जाताना ही ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्‍ये सहा जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अपघातामध्‍ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput )याचे पाच नातेवाईक ठार झाले आहेत. यामध्‍ये हरियाणाचे वरिष्‍ठ पोलिस अधिकारी ओपी सिंह  यांचे मेहुणे, दोन भांचे व अन्‍य दोन नातेवाईकांचा समावेश आहे. ट्रक आणि सुमोची सकाळी सहा वाजता सिकंदर-शेखपूर मुख्‍य मार्गावर पिपरा गावानजीक समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, सहा जण जागीच ठार झाले. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांना पटणा येथे हलविण्‍यात आले आहे. दोन्‍ही वाहनांमध्‍ये सुमारे १५ प्रवाशी होते, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button