Latest

First Tweet : ‘हे’ होत जगातील पहिलं ट्विट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

गोष्ट कोणतेही असो, त्यामध्ये पहिलं काय असतं याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. त्याची सुरुवात कशी झाली? त्याचा प्रवास कसा झाला. आताची स्थिती काय याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. आजच्याच दिवशी म्हणजे २१ मार्च २००६ रोजी जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स व बिज स्टोन यांनी एकत्रितपणे अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग सेवा ट्विटर (First Tweet) ची स्थापना केली हाेती. 

First Tweet :  हे होत पहिलं ट्विट 

आज आपण बऱ्याच गोष्टी ट्विटरवर शेअर करत असतो; पण कधी प्रश्न पडला आहे का पहिलं ट्विट कोणतं होतं. चला तर मग जाणून घेवूया  पहिलं ट्विट कोणतं होतं ते.

ट्विटरचे पहिले ट्विट ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी केले होते. जॅक डोर्सी यांनी ट्विट केले होते की, " Just setting up my twttr" . आणि त्यावेळी ट्विटरचं नाव 'Twttr' असं होतं. २१ मार्च २००६ रोजी जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स व बिज स्टोन यांनी एकत्रितपणे अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग सेवा ट्विटर ची स्थापना केली. जुलै २००६ मध्ये त्यांनी सोशल मीडिया युझर्ससाठी उपलब्ध केले. 

ट्विटर बद्दल हे  माहीत आहे का? 

फेसबुक, इन्स्टाग्राम आहे तसेच ट्विटर ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. याचा वापर आपण संवाद साधण्यासाठी करतो. आज ट्विटर ही जगातील एक लोकप्रिय वेबसाइट आहे. जेव्हा आपण एखादा संदेश ट्विटरवर शेअर करतो त्याला ट्विट असे म्‍हटलं जातं.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT