Toyota Mirai : पेट्रोल-डिझेलला सुट्टी! कशी आहे टोयोटा मिराई हायड्रोजन इलेक्ट्रिक कार | पुढारी

Toyota Mirai : पेट्रोल-डिझेलला सुट्टी! कशी आहे टोयोटा मिराई हायड्रोजन इलेक्ट्रिक कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोयोटा मिराई (Toyota Mirai) ही देशातील पहिली हायड्रोजनवर आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक कार (FCEV) लॉंच केली. ही कार केंद्र सरकारच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत लाँच करण्यात आली. या कारच्या अनावरणाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: टोयोटा मिराईचा वापर करणार आहेत. ही कार  पर्यावरण बचावासाठीचं योगदान  देणारी ठरेल असंही यावेळी सांगण्यात आले.

परिवहन मंत्रालयाने बुधवारी हायड्रोजनवर चालणाऱ्या कारसाठी म्हणजेच इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायलट प्रकल्प सुरू केला. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या FCEV टोयोटा मिराई कार ही याच पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) सोबत, हायड्रोजनवर चालणाऱ्या जगातील सर्वात प्रगत FCEV Toyota Mirai चा अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट आयोजित केला आहे, जे भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीवर चालते.

टोयोटा मिराई हायड्रोजन फ्युएल सेल बॅटरी पॅकद्वारे सुसज्ज आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 600 किलोमीटरपर्यंत वाढवते. यामध्ये वीज निर्मितीसाठी हायड्रोजनचे ज्वलन केले जाईल आणि या कारच्या टेलपाईपमधून फक्त पाणी सोडले जाईल.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) सोबत, भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीवरील जगातील सर्वात प्रगत FCEV चा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी Mirai च्या दुसऱ्या पिढीच्या आवृत्तीचा वापर करून पायलट प्रोजेक्ट लाँच केला.

पेट्रोल आणि सीएनजी खर्चाशी तुलना

टोयोटा मिराई (Toyota Mirai) ही देशातील पहिली हायड्रोजनवर आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) आहे. ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारला धावण्यासाठी प्रति किमी 1 रुपये पेक्षा कमी खर्च येईल. पट्रोल वर चालणाऱ्या कारचा खर्च 5-7 रुपये प्रत‍ि क‍िमी आहे. तर सीएनजी कारचा खर्च 3 ते 4 रुपये प्रत‍ि क‍िमी इतका आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, यांनी या सेडान कारचे अनावरण केले, यावेळी त्यांनी असेही जाहीर केले की टोयोटाने नुकतेच लॉंच केलेले केमरी हायब्रिड (भारतात विकले जाणारे कॅमरीचे एकमेव मॉडेल) हे नजीकच्या काळात फ्लेक्स-इंधनने सुसंगत असेल.

जगातील सर्वात अॅडव्हान्स FCEV टोयोटा मिराईचे परीक्षण हे इंटरनॅशनल सेंटर फॅार ऑटोमेटिव्ह टेक्नॅालॅाजी (ICAT) सोबत मिळून पायलट प्रोजेक्टने काम केले. या कारने एकवेळची टाकी फुल केल्यानंतरच्या चाचणीमध्ये 1359 किलोमीटर इतके अंतर पार केले. ज्यामुळे या कारची सर्वाधिक अंतर पार करणारी फ्यूअल सेल इलेक्ट्रिक कार म्हणून ओळख निर्माण झाली. यामुळे टाटा मिराईची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड मध्ये चांगला परफॅार्मंस देणारी कार म्हणून नोंद झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहनाचा वेग अधिक असेल

इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने टोयोटाने ही कार डिझाइन केली आहे. ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी ही देशातील पहिली कार आहे. विशेष म्हणजे या कारचा वेग इलेक्ट्रिक वाहनापेक्षा जास्त आहे. यामधील महत्त्वाचा घटक ग्रीन हायड्रोजन हा अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो. ग्रीन हायड्रोजनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती आणि त्याचा वापर भारतासाठी स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा हे आपले पर्यावरणाचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही गडकरी यांनी या कारच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी बोलताना सांगितले.

फरिदाबाद येथील इंडियन ऑईलने या वाहनासाठी ग्रीन हायड्रोजनचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. पायलट प्रोजेक्ट हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो आगामी काळातील पर्यावरणाच्या प्रदुषण बचावाकरिता नियोजित केलेला आहे. जो जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देईल आणि त्याद्वारे २०४७ पर्यंत भारताला ‘ऊर्जा आत्मनिर्भर’ बनवेल. या कारची सर्वात ग्रिनेस्ट कार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (FCEV) हे हायड्रोजनवर आधारित सर्वोत्तम शून्य उत्सर्जन करणारा पर्यावरणपुरक असा बदल अनुभवण्यास देते.

हेही वाचा

Back to top button