WhatsApp Features २०२२ : व्हॉट्स अ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठवणाऱ्याचा डीपी | पुढारी

WhatsApp Features २०२२ : व्हॉट्स अ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठवणाऱ्याचा डीपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्स अ‍ॅप मेसेंजर अ‍ॅप (WhatsApp Features २०२२) हे सोशल मीडिया युजर्स मध्ये लोकप्रिय असणारे अ‍ॅप आहे. व्हॉट्स अ‍ॅप नेहमीच युजर्संना हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने त्याची लोकप्रियता टिकून आहे. पाहूया व्हॉट्स अ‍ॅपने आपल्या युजर्संना नवीन वर्षात काय दिले आहे. 

WhatsApp Features २०२२

व्हॉट्स अ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्संना नवीन फिचर देत असते. नुकतचं व्हॉट्स अ‍ॅपचे एक फिचर आले आहे. आता व्हॉट्स अ‍ॅप युजर्संना त्यांना मेसेज पाठवण्याऱ्यांचा डीपीही (Display Profile/ Picture) दिसणार आहे. 
WhatsApp Dp www.pudhari.news
व्हॉट्स अ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठवण्याऱ्याचा डीपी
वर्षातील हे पहिले नवीन फिचर
आता व्हॉट्स अ‍ॅप युजर्संना त्यांना मेसेज पाठवण्याऱ्याचा डीपी (Display Profile/ Picture) दिसणार आहे. यापूर्वी  मेसेज पाठवण्याऱ्यांचा डीपी दिसत नव्हता. तर फक्त मेसेजचे नोटिफिकेशन दिसत होते. व्हॉट्स अ‍ॅपने  केलेले हे नवीन फिचर फक्त आयओएस बीटा युजर्संसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्स अ‍ॅप २.२२.१.१ बीटा व्हर्जन आयओएस १५ चे युजर्स वापरत आहेत.
WABetaInfo ने आपल्या ब्लॉगवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, आता व्हॉट्स अ‍ॅपवर जेव्हा मेसेज येईल तेव्हा आता मेसेज करणाऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसणार आहे. तुम्हाला वैयक्तिक मेसेज बरोबरच तुम्ही 
जर एखाद्या ग्रुपमध्ये असाल तरीही तुम्हाला मेसेज करणार्‍याचा  प्रोफाईल फोटो दिसणार आहे. पुढेही असेही म्हटले आहे की, ज्या लोकांच्या व्हॉट्स अ‍ॅप डीपी फिचर नाही त्यांनाही लवकरचं आम्ही देवू. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.   
हेही वाचलंत का? 

 

 

Back to top button