Whatsapp ग्रुप ॲडमिन करु शकेल ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, नवे फीचर

Whatsapp ग्रुप ॲडमिन करु शकेल ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, नवे फीचर

पुढारी ऑनलाईन डेस्क

व्हॉटस् अॅप (WhatsApp) अनेक नव्या फिचर्सवर काम करत आहे. यातील एक महत्वाचे अपडेट म्हणजे आता ग्रुप ॲडमिन ग्रुपमधील सर्व मेसेज डिलीट करु शकणार आहे. म्हणजेच ग्रुप ॲडमिन डिलीट फॉर ऑल फीचरचा वापर करुन सर्वांसाठी ग्रुपवरील मेसेज डिलीट करु शकू शकतो. एका वृत्तानुसार, Whatsapp ने एक नवीन 2.22.1.1 अपडेट जारी केले आहे. यामुळे व्हॉटस् अॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच ॲडमिनला ग्रुपमधील दुसऱ्यांचे मेसेज डिलीट करता येतील.

पण एखाद्या ग्रुपवर एकापेक्षा अधिक ॲडमिन असतील तरच हे अपडेट लागू होणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अखेर WhatsApp मेसेज डिलीट करण्याविषयी नवीन अपडेट देत आहे. यामुळे ॲडमिन ग्रुपमध्ये आलेले मेसेज हटवू शकतो. तसेच भविष्यातील अपडेटमध्ये ग्रुप ॲडमिन व्हॉटस्‌ ॲप ग्रुप्सला मॉडरेट करु शकतो.

हे फीचर सध्या इंटरनल टेस्टिंग फेजमध्ये आहे. हे फीचर कधी सादर केले जाणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच Whatsapp अँड्रॉइड उपकरणांसाठी नवीन इन-अॅप कॅमेरा इंटरफेसचीही चाचणी करत आहे.

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. नुकतेच WhatsApp ने युजर्ससाठी नवीन सुरक्षा अपडेट आणले. WhatsApp चे नवीन प्रायव्हसी फिचर युजर्सच्या चॅटसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि बरेच काही हाईड करण्याच्या संबंधीत आहे. WhatsApp ने युजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर्स आणले आहे. या नवीन फीचरद्वारे, अनोळखी WhatsApp कॉन्टॅक्ट, ज्याच्याशी कधीही चॅट केले गेले नाही, त्याला लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस दिसणार नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news