व्हाॅट्स ॲपने (WhatsApp) मागील काही महिने एका फिचरचे टेस्टींग सुरु केले होते. संबंधित फिचरला अनुसरून व्हाॅट्स ॲपने सांगितले होते की, "डेस्कटॉप युझर्स ( व्हाॅट्स ॲप वेब ॲक्सेस घेणारे) मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही मेसेज, फोटो शेअर करु शकता. तुम्हाला इतर कोणी मेसेज केला तर माेबाईल इंटरनेट सुरु नसतानाही मेसेज तुम्हाला डेस्कटॉप हाॅट्स ॲपवर मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला व्हाॅट्सॲप वापर करत असताना तुमच्या मोबाईलला इंटरनेटची गरज भासणार नाही.
सुमारे ८ महिन्यांच्या टेस्टिंगनंतर व्हाॅट्स ॲपने हे नवीन फिचर बीटा युजर्सना उपलब्ध करून दिले आहे. व्हाॅट्स ॲप डेस्कटॉपचे युजर्स आपला मोबाईल फ्लाईट मोड (Flite Mode) वर ठेवूनही आता या फिचरमुळे हाॅट्स ॲपचा वापर करु शकतील.