Latest

‘ठिपक्यांची रांगोळी’ : नव्या मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकर कोण आहे?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवर ४ ऑक्टोबरपासून ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर दिसणार आहे. तिच्यासोबत चेतन वडनेरेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानदा रामतीर्थकर ही अपूर्वाची भूमिका साकारेल. तर चेतन हा शशांकची भूमिका करताना दिसेल.

या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.

ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी दोघंही खूप उत्सुक आहेत.

ज्ञानदा म्हणाली, मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम. अनेक दिग्गज कलाकार आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आहे.

सेटवरचं सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देतं.

अपूर्वा साकारताना तिची एनर्जी कॅरी करणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं. मात्र आता हळूहळू मला सवय होतेय.

चेतन म्हणाला, 'शशांक हा अतिशय हुशार मुलगा आहे. तो वैज्ञानिक आहे. परदेशातून कामाची संधी मिळत असली तरी कुटुंबाला सोडून त्याला परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्याचा त्याच्या कुटुंबावर खूप जीव आहे.

संस्कार आणि मूल्य जपणाऱ्या शशांकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्या विरोधी विचारांची मुलगी येते.

तेव्हा नेमकं काय होतं हे मालिकेत पाहायला मिळेल.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या नावाप्रमाणेच मालिकेचं कथानकही नाविन्यपूर्ण आणि एकत्र कुटुंबाचं महत्त्व पटवणारं आहे.

कोण आहे रामतीर्थकर?

ज्ञानदा ही टीव्ही अभिनेत्री आहे. शतदा प्रेम करावे, सख्या रे, जिंदगी नॉट आऊट या मालिकेत दिसली होती.

२०२१ मध्ये तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने शादी मुबारक या मालिकेत काम केले आहे.

ज्ञानदाचा जन्म २६ जून १९९५ रोजी पुण्यात झाला. थिएटर आर्टिस्ट म्हणून तिने काम केले.

२०१६ मध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली.

तिला सख्या रे ही पहिली मालिका मिळाली. यामध्ये तिने वैदेही ही व्‍यक्‍तिरेखा पार पाडली होती.

२०२० मध्ये मराठी चित्रपट धुरळामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

यामध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, अलका कुबल य़ांच्या भूमिका होत्या.

ज्ञानदाचे शिक्षण पी ई. एस. मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, शिवाजी नगर, पुणे येथे झाले.

तर महाविद्यालयीन शिक्षण तिने पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, येथे पूर्ण केले.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची आहे.

गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज या मालिकेत आहे.

पाहायला विसरु नका नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

SCROLL FOR NEXT