चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक | पुढारी

चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक : राज्यभर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय तसेच त्रासाला सामोरे जावे लागत असून यावर मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी आपली चिंता व्यक्त करत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावेत यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांसोबत बुधवारी सायंकाळी बैठक बोलावली आहे.

मुसळधार पावसाने राज्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेषत: कोकणाकडे जाणारा मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीपर्यंतच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पसरले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई-नाशिक रस्त्याचीही पावासाने दुर्दशा झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती. अन्य सर्व कामे थांबवून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांच्या स्थितीवर अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रवासाचा वेळ वाढला असून वाहतूक कोंडीने प्रवासी आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली.

हे ही वाचलं का?

Back to top button