kanhaiya kumar : कन्हैया कुमार यांचा AC कांड | पुढारी

kanhaiya kumar : कन्हैया कुमार यांचा AC कांड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टीचे पूर्व नेते कन्हैया कुमार (kanhaiya kumar) यांनी काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकीकडे त्यांच्या निर्यणाचं स्वागत केलं जात आहे तर, दुसरीकडे बिहारच्या सोडचिठ्ठी दिलेल्या सीपीआय कार्यालयाच्या खोलीतील AC काढून नेला म्हणून विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर सीपीआय कार्यालयातील कन्हैया कुमार यांचं AC कांड नेमका काय आहे? हे जाणून घेऊ…

ज्या सीयीआयने कन्हैया कुमार (kanhaiya kumar) यांना विद्यार्थीदशेपासून एका राजकीय नेत्यापर्यंत पोहोच दिली, प्रतिष्ठा दिली, त्याच कार्यालयात स्वतःच्या खर्चाने बसवलेला AC कन्हैया कुमार यांनी काढून नेला. नेमकी ही गोष्ट विरोधकांनी हेरली आणि सोशल मीडियावर कन्हैया कुमार यांच्यावर टीका होऊ लागली.

यासंदर्भात पटना (बिहार) येथील सीपीआय कार्यालयातील कन्हैयांच्या ‘AC’कांडवर कार्यालय सचिव इंदभूषण वर्मा यांनी माध्यमांना सांगितलं की, “कन्हैया कुमार यांना राहण्यासाठी सीपीआय कार्यालयात खोली देण्यात आली होती. आजही त्यांच्याकडे त्या खोलीची चावी आहे. त्या खोलीत जास्त उकडते म्हणून कन्हैया यांनी स्वतःच्या खर्चाने AC लावून घेतलेला होता.”

“AC काढून नेण्यापूर्वी काही दिवस अगोदर कन्हैया कुमार कार्यालयात आलेले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या बाहेर एक खोली घेतलेली आहे. तिथेही उकडते, त्यामुळे कार्यालयाच्या खोलीतील AC आम्ही काढून त्या खोलीत नेणार आहोत. त्यावेळी आम्ही कन्हैया यांना AC काढून नेण्यास परवानगी दिली. तर दोन महिन्यांपूर्वीच कन्हैया यांनी AC काढून नेलेला आहे”, असं स्पष्टीकरण इंदभूषण वर्मा यांनी माध्यमांना दिलं आहे.

आता कन्हैया कुमार यांनी AC काढून नेला. पण, ते पक्ष सोडणार आहेत याची कोणतीही कल्पना सीपीआयला नव्हती. कारण, AC काढून नेल्यानंतरही कन्हैया कुमार हे पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. बेगूसराय जिल्हा कमिटीच्या बैठकीतसुद्धा उपस्थित होते. त्यांच्याबरोबर त्यांचे कित्येक सहकारीदेखील होते. आम्हाला याची कल्पनाच नव्हती की, ते पक्ष सोडणार आहेत”,असंही वर्मा यांनी सांगितले.

इंदभूषण वर्मा पुढे म्हणाले की, “आता पक्ष कार्यालयातील हलचाली व्यवस्थित होत्या. त्यामुळे आम्हाला पक्ष सोडण्याबद्दल माहिती नव्हती. आम्हाला प्रसार माध्यमांमधूनच याची माहिती मिळाली की, कन्हैया कुमार पक्ष सोडून जाणार आहेत. पण, आजही कार्यालयाची खोली त्यांच्याच नावावर आहे आणि त्याची चावीही त्यांच्याकडेच आहे. २६ सप्टेंबर दिवशी सर्व जण त्या खोलीतून निघून गेले.”

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय?

Back to top button