पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील हँगझोऊ येथे १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या आज (दि.४) ११ व्या दिवशीही भारताकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या ७१ वर गेली आहे. भारतीय खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्सवर' लिहिले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. ७१ पदकांसह, आम्ही आमची आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका साजरी करत आहोत. जो आमच्या खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि क्रीडा भावनेचा पुरावा आहे. प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकतो. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्व खेळाडूंचे अभिनंदन," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज ११ वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, १५ पदके मिळाली. तर आठव्या दिवशी, नवव्या दिवशी सात आणि दहाव्या दिवशी नऊ पदके मिळाली. आजही भारताची सुवर्ण घौडदौड सुरू आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिकमध्ये भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. यामुळे आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या ७१ वर गेली आहे. भारताने २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत ७० पदके मिळवली होती. आता २०२३ च्या क्रीडा स्पर्धेत हा आकडा पार केला आहे. भारत १६ सुवर्ण, २६ रौप्य आणि २९ कांस्यपदकासह पदक तालिकेत चौथ्या स्थानी आहे.
हेही वााचा :