पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता 6 ऑक्टोबर रोजी हाँगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. (Asian Games 2023 AFG vs SL)
संबंधित बातम्या :
श्रीलंकेने अफगाणिस्तानला पहिल्या डावात 116 धावांवर रोखल्यानंतर, सामना त्यांच्या हातात आल्यासारखे वाटत होते. श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. पहिल्या 10 षटकांसाठी आवश्यक धावगतीपेक्षा ते पुढे होते. अफगाणिस्तानने मात्र लढाऊ वृत्ती आणि जिद्द दाखवून सामना आपल्या नावावर केला. श्रीलंकेची टीम 117 धावांचा पाठलाग करताना 108 धावांवरच आउट झाली. अफगाणिस्तानने लंकन संघाला स्पर्धेतून बाहेर काढत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. युवा लेगस्पिनर कैस अहमदने तीन महत्त्वाचे विकेट्स घेत श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजीला सुरूंग लावला. त्याच्यासोबत गुलबदिन नायबने पॉवरप्लेमध्ये दोन्ही लंकन सलामीवीरांना माघारी पाठवले. 4 षटकांमध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या. नूर अली झद्रानने पहिल्या डावात अर्धशतक झळकावून विजयापर्यंत नेले. त्यानंतर अफगाणिस्तानने अप्रतिम गोलंदाजी करत आशियाई क्रीडा 2023 च्या उपांत्य फेरीत धडक मारली.
हेही वाचा :