Asian Games 2023 : भारताला डेकॅथलॉनमध्ये रौप्य, ‘ट्रीपल जंप’मध्ये कांस्यपदक!

Asian Games 2023 : भारताला डेकॅथलॉनमध्ये रौप्य, ‘ट्रीपल जंप’मध्ये कांस्यपदक!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशिया क्रीडा स्पर्धेच्या 10 व्या दिवशी आज (दि. 3) मंगळवारी भारताच्या धावपटूंनी मैदान गाजवले. भारताच्या तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत 10 विविध खेळ खेळले जातात. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. 1974 पासून भारताला या स्पर्धेत एकही पदक मिळालेले नाही. 1974 मध्ये विजयसिंह चौहानने सुवर्ण आणि सुरेश बाबूने कांस्यपदक जिंकले होते. या पदकांसह भारताची पदकसंख्या 62 पर्यंत पोहचली.

प्रवीण चित्रवेलला 'ट्रीपल जंप'मध्ये कांस्यपदक!

प्रवीण चित्रवेलने पुरुषांच्या ट्रीपल जंपमध्ये तिहेरी उडी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याने सहाव्या प्रयत्नात 16.68 मीटर उडी मारली आणि तिसरे स्थान पटकावले. भारताचा अबू बक्कर 16.62 मीटरच्या उडीसह चौथ्या स्थानावर राहिला.

पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत भारताच्या मोहम्मद अफसलने रौप्यपदक पटकावले. त्याने 1 मिनिट 48.43 सेकंदांची वेळ घेत शर्यत यशस्वीरित्य पूर्ण केली. शेवटच्या काही मीटरमध्ये सौदी अरेबियाच्या एसा अलीने त्याच्यावर आघाडी घेतली आणि त्याचे सुवर्णपदक हुकले. भारताचा कृष्ण कुमार पाचव्या स्थानावर राहिला. या पदकासह भारताची पदकसंख्या 65 पर्यंत पोहचली आहे.

5000 मी. शर्यतीत भारताला सुवर्णपदक! पारुलची ऐतिहासिक 'गोल्डन धाव'

धावपटू पारूल चौधरीने इतिहास रचला. तिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीच्य जोरावर भारताच्या खात्यात 14 वे सुवर्णपदक जमा झाले असून एकूण पदकांची संख्या 64 पर्यंत पोहचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.

पारुलचे सलग दुसरे पदक

दरम्यान, पारुल चौधरीचे हे सलग दुसरे पदक आहे. काल सोमवारी तिने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मैदान गाजवले होते. तिने 9 मिनिटे 27.63 सेकंदांची वेळ घेत रौप्यपदक पटकावले होते तर याच स्पर्धेत भारताच्या प्रिती लांबाने (वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते.

विद्याने कांस्यपदक जिंकले

विद्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. तिने 55.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले. बहरीनच्या अदेकोयाने 54.45 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी चीनच्या जियादी मोने 55.01 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. भारताचे हे 63 वे पदक ठरले.

स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत दोन पदके निश्चित!

भारतीय स्क्वॉशपटू दीपिका पलिकल (Dipika Palikal) आणि हरिंदर पाल सिंग संधू (Harindar Pal Singh Sandhu) यांच्यासह अनाहत सिंग-अभय सिंग या जोड्यांनी मंगळवारी शानदार विजय मिळवले. या विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सामन्यात या भारतीय जोड्यांनी सेमीफायनलमध्ये (Quarter Finals) प्रवेश केला.

भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या जेमिका अरिबाडो आणि अँड्र्यू गारिका यांचा 2 विरुद्ध 1 गेमने (7-11, 11-5, 11-4) पराभव केला. भारतीय जोडीला फिलीपाईन्सच्या जोडीने कडवी झुंज दिली आणि पहिला गेम जिंकला. पण दीपिका आणि हरिंदर यांनी शानदार पुनरागमन केले आणि पुढेचे दोन्ही गेम जिंकून सामना खिशात टाकला. याचबरोबर या जोडीने सेमीफायनल गाठली असून भारतासाठी पदक निश्चित केले आहे.

दरम्यान, अनाहत सिंग आणि अभय सिंग या आणखी एका भारतीय जोडीने स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सेमीफायनलमध्ये प्रवेश करून पदक निश्चित केले आहे. भारतीय जोडीने हाँगकाँगच्या त्झे विंग टाँग आणि मिंग हाँग तांग यांचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यातही भारताने वर्चस्व राखले. सलग दोन गेम (11-10 11-8) जिंकून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. हाँगकाँगने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीयांनी कोणतीही चूक केली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news