Asian Games 2023: बॉक्सिंगमध्ये परवीन हुड्डाला कांस्यपदक; यापूर्वीच पॅरिस ऑलिम्पिकचे स्थान निश्चित | पुढारी

Asian Games 2023: बॉक्सिंगमध्ये परवीन हुड्डाला कांस्यपदक; यापूर्वीच पॅरिस ऑलिम्पिकचे स्थान निश्चित

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडली आहे. आशियाई क्रिडा स्पर्धा, २०२३ मध्ये भारताची बॉक्सिंगपटू परवीन हुड्डा हिने आज (दि.४) कांस्य पदकाची कमाई केली आहे. परवीनने यापूर्वीच सेमीफायनल गाठत पॅरिस ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले आहे. (Asian Games 2023)

बॉक्सिंगपट्टू परवीन हुड्डा हिने ५७ किलो वजनी गटात (फेदरवेट) कांस्य पदक मिळवले आहे. तिला दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या चीनच्या लिन यू टिंगकडून 5-0 अशी हार पत्करावी लागली. परंतु तिने कांस्यपदकावर आपले स्थान कायम केले. (Asian Games 2023)

यापूर्वी स्पर्धांमध्ये परवीन हुड्डा हिने २०१९ मध्ये नेपाळ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक, जर्मनीमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक तर २०२२ च्या तुर्की सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आतापर्यंत तिने सुमारे १० वेळा राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. (Asian Games 2023)

 ७३ पदकांसह पदतालिकेत भारत चौथ्या स्थानी

आशियाई क्रिडा स्पर्धा, २०२३ मध्ये भारताच्या खात्यात १६ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह एकूण ७३ पदके आहेत. जागतिक पदकतालिकेत ७३ पदकांसह भारत चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा:

Back to top button