कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरला महापुराचा विळखा(kolhapur flood ) पडला आहे. तीन तुकड्या याआधी कोल्हापुरात आल्या आहेत. महापुराचा मुकाबला करण्यासाठी (kolhapur flood) निवारी एनडीआरएफच्या आणखी चार तुकड्या कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
अधिक वाचा:
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने शहरासह चिखली, शिये, कसबा बावड्यासह शहरातील उपनगरांना महापुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरित करावे लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या होत्या. महापुराची तीव्रता ओळखून आणखी तुकड्या मागविण्यासाठी पालकमंत्री पाटील प्रयत्नशील होते.
अधिक वाचा:
त्यानुसार आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने एनडीआरएफच्या चार तुकड्या कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
एनडीआरएफच्या एका तुकडीत २५ जवान आणि दोन बोटी असतात.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली असून पाणीपातळी कमी होत आहे. तरीही अजून बचावकार्य सुरू आहे.
शहरातील सखल भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयच पाण्यात गेल्याने जिल्हा परिषदेतून कामकाज पाहिले जात आहे.
अधिक वाचा
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी मदतकार्यात सक्रीय आहेत.
हेही वाचा
पहा व्हिडिओ: शहराला महापुराचा विळखा