Latest

Anil Parab Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा बारामती दौरा ठरला

backup backup

Anil Parab Kirit Somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मागीलवेळी स्थगित झालेल्या बारामती दौऱ्याला मुहुर्त मिळाला आहे. येत्या बुधवारी (दि. ६) सोमय्या हे बारामतीत येत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांचे तत्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या येथील मालमत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येणार आहेत.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी बारामतीचा दौरा जाहीर केला होता. परंतु ऐनवेळी तो स्थगित झाला. त्यानंतर सोमय्या यांनी नुकताच कोल्हापूर दौरा करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले.

Anil Parab Kirit Somaiya : आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समावेश

पारनेर कारखान्यासंबंधी त्यांनी केलेल्या आरोपांना शनिवारी (दि. २) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा नामोल्लेख न करता उत्तर दिले. आता बारामती दौऱ्यात त्याबद्दल सोमय्या काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्यासोबत आमदार गोपिचंद पडळकर हे ही दौऱ्यात सहभागी असणार आहेत. खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर हे दोघे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT