कोल्हापूर झाडाचा वाढदिवस : कोल्हापूरकरांचा नादखुळा गांधी जयंतीला लावलेल्या झाडाचा ९ वा वाढदिवस जल्लोषात साजरा | पुढारी

कोल्हापूर झाडाचा वाढदिवस : कोल्हापूरकरांचा नादखुळा गांधी जयंतीला लावलेल्या झाडाचा ९ वा वाढदिवस जल्लोषात साजरा

शिरटी (शिरोळ) : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर झाडाचा वाढदिवस : कोल्हापूरकर कोणत्या गोष्टीत जल्लोष करतील याचा काही नेम नाही. वाढदिवस कोणाचा का असेने त्याच सेलेब्रेशन झाले पाहीजे हा कोल्हापुरकरांचा नेहमी अजेंडा असतो. मग त्यासाठी फुगे, केक, मेणबत्त्या सगळ्या गोष्टी आल्या. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शिरटी गावात असाच एका झाडाचा वाढदिवस जल्लोषात साजर करण्यात आला आहे.

कोल्हापुरात माणसांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे ठीक आहे हो. पण आता झाडांचाही वाढदिवस मोठ्या थाटामाटात करण्यात आला. दरम्यान या वाढदिवसाला गावातील नेतेमंडळींनीही उपस्थिती लावली होती.

कोल्हापूर झाडाचा वाढदिवस : शिरोळ तालुक्यातील घटना

गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध व्यक्तींचे वाढदिवस साजरे होतात. चौका-चौकात डिजिटल फलकही झळकतात. मात्र शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे आगळावेगळा असा चक्क झाडाचा वाढदिवस साजरा केला गेला. याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. येथील ग्रामस्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या पारकट्याच्या मध्यभागी २ ऑक्टोबर २०१२ रोजी वृक्ष लावले आहे. आज शनिवारी या बहरलेल्या वृक्षाचा प्रतिवर्षीप्रमाणे ९ वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील चावडी कट्टा ग्रुप व ग्रामस्थांमार्फत या वृक्षाचे अतिशय काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. झाडाभोवती रांगोळी रेखाटण्यात आली होती. फुलांच्या माळा, मेणबत्ती, फुगे, बांधून आकर्षक सजावट केली होती. प्रारंभी जेष्ठ नागरिक दादासो शिरगावे, रामगोंडा पाटील, आण्णासो सुतार यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मोठ्या थाटामाटात वाढदिवस

ग्रामस्थांनी केक कापून झाडाचा ९ वा वाढदिवस साजरा केला. उपस्थित बालचमू व नागरिकांना अल्पपोहार वाटप करण्यात आला. यावेळी लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभाही झाली होती. गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे येथील नागरिकांमध्ये झाडांविषयी असलेली आपुलकी दिसून येते. यावेळी बालचमुंसह नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button