Latest

Jalna Flood : हाहाकार! नालेवाडी गावाला पुराचा वेढा; मांगणी, लेंडी नदीला पूर

दीपक दि. भांदिगरे

वडीगोद्री (जालना); पुढारी वृत्तसेवा : Jalna Flood : वडीगोद्री मंडळात पुन्हा पावसाने हाहाकार उडाला आहे. एकाच रात्री पुन्हा मांगणी आणि लेंडी नदीला पूर आला आहे. नालेवाडी गावाला दोन्ही बाजूने पाण्याने वेढले आहे. गावातील २० ते २५ घरांत पाणी शिरले असून वडीगोद्री भांबेरी रोडवरील नालेवाडीचे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहे.

या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद झाली आहे. मांगणीलाही पूर आल्याने नदी काठच्या भागातील पिके व फळबागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.

शेती शिवारातून खळखळ पाणी वाहत आहे. वारंवार सुरू असलेल्या पावसामुळे मांगणी नदीला तिसऱ्यांदा पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अरे वरुणराजा अजून किती बरसशील. या बळीराजाला किती यातना सहन करायला लावशील. आता तरी बस कर रे वरुण राजा… अजून किती अंत पाहशील, अशी आर्त हाक बळीराजा देत आहे.

नालेवाडीतील २० ते २५ घरांत शिरले पुराचे पाणी

Jalna Flood : नालेवाडी गावच्या दोन्ही बाजूने असलेल्या नदीला पूर आला असून यामुळे नदीकाठच्या घरांत पाणीच पाणी झाले आहे. लोक घरातून पाणी बाहेर काढत आहेत. अनेक घरांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी असून अनेकांच्या घरातील धान्य व संसार उपयोगी साहित्य भिजले आहे.

नालेवाडीतील हा दुसरा पूर आहे. या पुरामुळे वडीगोद्री भांबेरी रोड रात्रीपासून बंद असून पाणी ओसरल्यानंतर तो सुरू होईल असे नागरिक सांगत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT