Latest

बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव विवाहबद्ध; फार्म हाऊसवर रंगला सोहळा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या बहिणीच्या फार्म हाऊसवर निवडक पाहुण्याच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगला.

तेजस्वी आणि त्यांची मैत्रीण एलेक्सिस गेल्या सहा वर्षांपासून प्रेमात आहेत. एलेक्सिस या एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करत होत्या. त्यांनी आता ब्रेक घेतला असून तेजस्वी यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. तेजस्वी यादव हे बिहारच्या राजकारणातील फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात.

लग्नानंतर आता एलेक्सस उर्फ राशेल गोडिन्हो आता राजेश्वरी यादव नावाने ओळखल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. तेजस्वी यादव हे साखरपुड्यांनंतर दोन महिन्यांनी लग्न करण्यास इच्छुक होते. मात्र, साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्नसोहळा झाला.

तेजस्वी यांची बहीण आणि लालू यादव यांची मुलगी मीसा भारती यांच्या मालकीचे फार्म हाऊस असलेल्या सैनिक फार्म येथे हा लग्नसोहळा पार पडला. येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. प्रत्येक गाडीची नोंद ठेवली जात होती. त्याबरोबरच बाऊसन्सर्सही तैनात केले होते.

येणाऱ्या प्रत्येक गाडीवर बारीक नजर होती. तसेच प्रवेश करताना तीनवेळा तपासणी करून आत सोडले जात होते. माध्यमांना दूर ठेवण्यासाठी बाऊसर्न्सना सक्त सूचना दिल्या होत्या. तेजस्वी यादव यांच्या लग्नासाठी ब्ल्यू आणि पिंक कलरने वेन्यू थीम सजवली होती. गेटवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांची आकर्षक सजावट केली होती. भव्य स्टेजवर फ्लॉवर बेड डेकोरेशन केले होते. तर जेवणात शाही खाना होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT