सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, तसेच अन्य ११ जणांचे पार्थिव दिल्लीत दाखल | पुढारी

सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, तसेच अन्य ११ जणांचे पार्थिव दिल्लीत दाखल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशाच्या सुरक्षेसह शेजारी राष्ट्राकडून करण्यात येणाऱ्या आगळीकी दरम्यान अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळणारे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव राजधानी दिल्लीत पोहोचले आहे.

नवी दिल्ली येथील लष्कराच्या पालम एअरबेसवर सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य ११ जणांचे पार्थिव आणण्यात आले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पार्थिवाला मानवंदना देतील.

बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या अकाली मृत्यूने देश स्तब्ध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तमाम नेत्यांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तामिळनाडूतील कुन्नूर मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपीन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. तर,ग्रुप कॅप्टन वरून सिंह गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डीएनए तपासणी करीत मृतदेहांची ओळख पटवण्यात येणार आहे.

रावत यांच्या अकाली मृत्यूने मात्र देशातील संरक्षण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या, गुरूवारी सर्व मृतदेह दिल्लीत आणण्यात येतील. सरकारकडून देखील संसदेत हेलिकॉप्टर दुर्घटनेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वायुदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

१०९ हेलिकॉप्टर यूनिटचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर पृथवी सिंह चौहान दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे पायलट होते. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह त्यांची पत्नी, ब्रिगेडियर एलएस लिड्डर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह,नायक गुरसेवक सिंह,नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश होता.

सीडीएस जनरल बिपीन रावत बुधवारी सकाळी दिल्लीतून वायुसेनेच्या विशेष विमानाने सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी सुलूरच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी ते सुलूर येथे पाहोचले. येथून ११ वाजून ४८ मिनिटांनी ते एमआय-१७व्ही५ या हेलिकॉप्टर ने वेलिंगटन ने रवाना झाले होते. वेलिंगटन मधील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.

कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा सुलूरच्या दिशेने रवाला झाले. पंरतु, परततांनाच दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी हेलिकॉप्टर मिसिंग रिपोर्ट आला. तात्काळ स्थानिक प्रशासनासह लष्कराच्या जवानांनी घटनास्थळ गाठून बचाव कार्य सुरू केले. पंरतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ३ फेब्रुवारी २०१५ मध्ये लेफ्टिनेंट जनरल असताना नॉगालॅन्डच्या दीमापूर मध्ये चीता हेलिकॉप्टर दुर्घनााग्रस्त झाले होते. या अपघातातून रावत थोडक्यात बचावले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button