Fighter film 
Latest

Fighter film : ‘फायटर’च्या शूटींगवेळी दीपिका-हृतिक एन्जॉय केलं कॉफी टाईम!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांचा आगामी 'फायटर' ( Fighter film ) हा चित्रपट या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग इटलीमध्ये सुरू आहे. दरम्यान हृतिक आणि दीपिकाचा नो मेकअप लूकमधील एक फोटो समोर आला आहे. यावरून 'फायटर' चित्रपटाची टिम कॉफी टाईमसोबत जबरदस्त मौजमस्ती करताना दिसत आहे.

संबधित बातम्या 

प्रसिद्ध लेखक अरफीन खान यांच्या इन्स्टाग्रामवर 'फायटर' ( Fighter film ) चित्रपटाच्या टिमचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, बॉस्को मार्टिस आणि इतर 'फायटर' चित्रपटाची टिम दिसतेय. इटलीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्रित टिम मौजमस्ती करताना दिसत आहेत. यावेळी हृतिकने सेल्फी घेतली असून दीपिका त्याच्या शेजारी पोझ देण्यासाठी खाली झुकताना दिसतेय.

हृतिक आणि दीपिकासोबत सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, बॉस्को मार्टिस यांच्यासोबत एका टेबलाभोवती बसलेला आहेत. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर सर्वांनी एकत्र कॉफीचा आनंद लुटला आहे. यावेळी हृतिकने ब्ल्यू शर्ट आणि ब्लॅक जॅकेट तर दीपिकाने व्हाईट रंगाचा आउटफिटवर ब्लॅक चप्पल परिधान केलंय. या फोटोला त्यांनी 'Fighter in action… " amazing people , amazing shoot' अशी कॅप्शन लिहिली आहे. या फोटोत दीपिका नो मेकअप दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चाहत्यासह अनेकांनी दोगांचे भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, हृतिक आणि दीपिका इटलीमध्ये दोन गाण्यांचे शूटिंग करणार आहेत. यापैकी एक घुंघरू फ्रॉम वॉरच्या आधारावर फूट-टॅपिंग डान्स असणार आहे. या चित्रपटातील गाणी बॉस्को आणि सीझर यांनी कोरिओग्राफर केली आहेत. सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्रित दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT