Gayatri Joshi Car Accident : इटलीमध्ये स्वदेस फेम गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात (Video)) | पुढारी

Gayatri Joshi Car Accident : इटलीमध्ये स्वदेस फेम गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात (Video))

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वदेस फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीमध्ये भीषण कार अपघात झाला आहे. (Gayatri Joshi Accident ) यावेळी तिच्यासोबत तिचे ती विकास ओबेरॉय होते. या अपघातात स्वित्झर्लंडमधील जोडपे ठार झाल्याची माहिती समोर आलीय. (Gayatri Joshi Accident)

(Video- Afroz Alam x वरून साभार)

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, सार्डिनियामध्ये एका रस्त्यावर जेव्हा लम्बोर्गिनी आणि फेरारी एका व्हॅनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा गायत्री आणि विकास यांची कार इतर कारला जाऊन धडकली आणि पलटली. धडक झाल्यानंतर फेरारीत आग लागली. यावेळी फेरारीतील एका जोडप्याचा मृत्यू झाला.

२००४ मध्ये स्वदेसमध्ये शाहरुख खानसोबत गायत्रीने अभिनय केला होता.

Back to top button