Parineeti Chopra : परिणीतीच्या चुडा समारंभाची झलक; मधू चोप्राने शेअर केला फोटो | पुढारी

Parineeti Chopra : परिणीतीच्या चुडा समारंभाची झलक; मधू चोप्राने शेअर केला फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आता मिसेस बनली आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने तिच्या स्वप्नातील राजकुमार राघव चढ्ढासोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर परिणीतीच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. दरम्यान त्याच्या लग्नातील अनके विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदी समारंभानंतर आता तिच्या चुडा समारंभाचे छायाचित्र समोर आलं आहे.

संबधित बातम्या 

परिणीतीने राजस्थानमधील उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये नेता राघव चढ्ढासोबत मोठ्या धुमधड्याक्यात लग्न केले. या शाही विवाहाला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत राजकिय नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनास दोघेजण उपस्थित नव्हते. दरम्यान प्रियांकाची आई मधू चोप्राने प्रियांका तिच्या कामात बिझी असल्याने लग्नाला आली नसल्याचा खुलासा केला होता. दरम्यान आता मधू चोप्राने सोशल मीडियावर परिणीतीच्या चुडा भरण्याच्या सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत ती पिवळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये भरगच्च दागिन्यानी नटल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर गोड हसूने सर्वाच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. परिणीतीच्या हातात चुडा असून तिने मोकळे केस आणि मेकअपमध्ये दिसतेय. हा फोटो पाहून मधु चोप्राने तिचे सर्वात आनंदी वधू म्हणून वर्णन केलं आहे. ‘परिणीतीच्या चुडा समारंभातील सर्वात आनंदी वधू.’ असे तिने फोटोला कॅप्शन लिहिले आहे. या शाही विवाहाला प्रियांका येवू शकली नाही मात्र, मधूने फंक्शनचा खूपच आनंद घेतला आहे.

या फोटोला चाहत्यांसह अनके बॉलिवूड स्टार्सनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे. या फोटोला आतापर्यत १५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. प्रियांकाने मुलगी मालतीसह परिणीतीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

Back to top button