Parineeti Raghav Reception: मुंबईत ‘या’दिवशी होणार राघव-परिणीतीचे रिसेप्शन, कार्ड व्हायरल | पुढारी

Parineeti Raghav Reception: मुंबईत 'या'दिवशी होणार राघव-परिणीतीचे रिसेप्शन, कार्ड व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Parineeti Raghav Reception) हे कपल २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नानंतर रिसेप्शन दिल्ली-चंदीगढ येथे होईल, असे म्हटले जात होते. पण आता रिसेप्शन मुंबईत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर हे जोडपे दिल्लीला परतले आहे. (Parineeti Raghav Reception)

आधी दोन ठिकाणी रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर आली होती. एक चंदिगडमध्ये आणि दुसरे मुंबईत. पण आता मुंबईत रिसेप्शन होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्ली, चंदीगढ येथील रिसेप्शन रद्द केल्याचे समजते आहे. आता ४ ऑक्टोबरला रिसेप्शन मुंबईत होणार आहे. यावेळी मित्रमंडळी, सर्व कलाकार उपस्थित राहतील, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, परिणीतीची बहीण प्रियांका चोप्रा रिसेप्शनलाही उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती समोर येतेय. दोघांच्या रिसेप्शनचे कार्ड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

Back to top button