Hritik Roshan : हृतिक रोशनने ‘फायटर’ची खास झलक केली शेअर | पुढारी

Hritik Roshan : हृतिक रोशनने ‘फायटर’ची खास झलक केली शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद आणि सुपरस्टार हृतिक रोशन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करत केली आहे. (Hritik Roshan) सध्या ” फायटर ” ची टीम सध्या इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. (Hritik Roshan)

या दोघांचा मागील ब्लॉकबस्टर “बँग बँग” आणि “वॉर” या दोन्ही चित्रपटांची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असताना आता हे दोघं फायटरसाठी एकत्र काम करताना दिसत आहे. हे दोन्ही चित्रपट २ ऑक्टोबर, २०१४ आणि २०१९ रोजी रिलीज झाले होते आणि त्यांच्या चित्रपटाच्या वर्धापन दिनानिमित्त या दोघांनी फायटरच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे. हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.

अप्रतिम कथा आणि दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ आनंद “फायटर” मधून पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. हृदयस्पर्शी स्टंट्स, चित्तथरारक व्हिज्युअल्स आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आकर्षक कथा असलेला “फायटर” हा एक हाय – ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन पुन्हा एकदा सिनेमॅटिक इतिहास रचण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)

Back to top button