Paris Fashion Week : ऐश्वर्याचा केंडल जेनरसोबत रॅम्प वॉक, एका Flying Kiss ने घायाळ प्रेक्षक | पुढारी

Paris Fashion Week : ऐश्वर्याचा केंडल जेनरसोबत रॅम्प वॉक, एका Flying Kiss ने घायाळ प्रेक्षक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय बच्चन पॅरिस फॅशन वीक पोहोचली. येथे तिने केंडल जेनरसोबत रॅम्प वॉक केला.  (Paris Fashion Week ) यावेळी तिच्यासोबत Eva Longoria आणि अन्य मॉडेल्स आणि अभिनेत्री होत्या. ऐश्वर्याचे रॅम्प वॉक करतानाचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. ऐश्वर्याचा रॅम्प वॉक पाहून प्रेक्षक नक्कीच घायाळ झाले असणार. तिने रॅम्पवरून एक फ्लाईंग किसदेखील दिला. (Paris Fashion Week )

संबंधित बातम्या – 

ब्युटी क्वीनने ब्राऊन अँड गोल्डन कलरचा आऊटफिट परिधान केला होता. तिचा ग्लॉसी लूक आणि रेड कलर लिपस्टीकने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. हातात अंगठ्या आणि स्टोन ईअरिंग्जने सर्वांचे लक्ष वेधले.

फॅशन शोमध्ये, ऐश्वर्याने तिच्या ग्लॅमरस गाऊनसोबत एक केप देखील घातला होता. यावेळी तिच्या केसांचा सोनेरी रंगही खूप सुंदर दिसतो. या अभिनेत्रीने स्टेजवरूनच फ्लाईंग किस देऊन चाहत्यांची मने जिंकली. एवढेच नाही तर कॅमेऱ्यासमोर पोज देताना ऐश्वर्याने डोळे मिचकावले. तिच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. तिच्या खास लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

video – Tweeting Anshu, Mohabbatein x  वरून साभार

Back to top button