Ram Charan : राम चरण मुंबईमध्ये! सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन (Video) | पुढारी

Ram Charan : राम चरण मुंबईमध्ये! सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता राम चरणला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पाहण्यात आलं. सुपरस्टार राम चरणने बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिराचा दौरा केला. (Ram Charan ) तेलुगु सुपरस्टार राम चरण मुंबईत आला असून त्याने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राम चरणने आपल्या आगामी चित्रपटासाठी मंगळवारी मुंबईत हजेरी लावल्याचे म्हटले जाते. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी करत आहेत. (Ram Charan )

संबंधित बातम्या – 

राम चरणचा मंदिर दौऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्याच्यासोबत शिवसेनेचे राहुल कनाल देखील होते. यावेळी त्याने काळ्या रंगाचा आउटफिट घातला होता. अनवाणी मंदिराकडे जाताना त्याचा व्हिडिओ पाहता येईल. यावेळी त्याने मंदिराबाहेर उपस्थित असलेल्या पॅपराझींना हात उंचावून नमस्कार देखील केला.

Video – Press Trust of India x वरून साभार 

व्हिडिओमध्ये, राम चरण गणपतीची पूजा करत नमस्कार स्थितीत उभा असलेला दिसत आहे. मंदिरातील पुजारी अभिनेताला कपाळावर टिळा लावताना आणि एक निळी शॉल, प्रसाद देताना दिसत आहेत.

ऋचा चड्ढानेदेखील घेतले बाप्पांचे आशीर्वाद

दरम्यान, फुकरे ३ च्या यशानंतर ऋचा चड्ढानेदेखील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ५ दिवसांत तिच्या या चित्रपटाने तब्बल ५० कोटी कमावले आहेत.

 

Back to top button