Amala Paul: आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडमध्ये येणार | पुढारी

Amala Paul: आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडमध्ये येणार

पुढारी ऑनलाईन

मुकेश भट्ट आणि जियो स्टुडिओज एक नवीन वेबसीरिज घेऊन येत आहेत. ‘रंजीश ही सही’ असे या सीरिजचे नाव असून, यातून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. वूट सिलेक्ट या ओटीटीवर याचवर्षी ही सीरिज येणार आहे. (Amala Paul)

या सीरिजमध्ये अमलासोबत अभिनेता ताहीर राज भसीन मुख्य भूमिकेत असणार आहे. ताहीरने ‘83’ चित्रपटात सुनील गावसकर यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे कौतुकही होत आहे. तसेच अमृता पुरीदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. पुष्पदीप भारद्वाज या सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. 70 च्या दशकातील बॉलीवूड यात पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडमधील लोकांवर आधारित यातील कॅरेक्टर आहेत. हा प्रेमाचा त्रिकोण असणार आहे.

Back to top button