जत : सोलापूर-कराड एक्सप्रेस मिरज जंक्शन मार्गे सुरु करा; प्रकाश जमदाडेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

जत : सोलापूर-कराड एक्सप्रेस मिरज जंक्शन मार्गे सुरु करा; प्रकाश जमदाडेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

जत: पुढारी वृत्तसेवा

सोलापूर – मिरज – सातारा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग २०११ पासून अस्तित्वात आहे. या रेल्वे मार्गावर कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगली, मिरज, कराड, सातारा ही प्रमुख शहरे वसली आहेत. त्यामुळे या मार्गावर मिरज जंक्शन मार्गे कराड एक्सप्रेस हि रेल्वे सुरू करावी अशी मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय मंत्री दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर – कराड एक्सप्रेस, कुर्डूवाडी- मिरज पॅसेंजर (मेमू) , पंढरपूर – सातारा पॅसेंजर (मिरज मार्गे) , कुर्डूवाडी- कराड पॅसेंजर , पंढरपूर -कराड पॅसेंजर डेमू, पंढरपूर- सांगली पॅसेंजर मेमू , सोलापूर- सांगली पॅसेंजर या रेल्वेगाड्या सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय होईल. तसेच सांगली सोलापूर सातारा जिल्ह्याचा गतीने विकास होण्यास मदत होईल.

तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोल्हापूर – सोलापूर एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गाडीसुद्धा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button